Krushik 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Krushik 2025 Exhibition : ‘कृषिक’मध्ये ११ कोटीचा घोडा वेधतोय सर्वांचे लक्ष

Agriculture Exhibition : माळेगाव, ता. बारामती येथे सुरू असलेल्या कृषिक प्रदर्शनात ११ कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Team Agrowon

Baramati News : माळेगाव, ता. बारामती येथे सुरू असलेल्या कृषिक प्रदर्शनात ११ कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

याशिवाय १५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडा आणि सोन्या-मोन्या ही बैल जोडीही या प्रदर्शनात गाजतायेत. ‘ग्लोबल ते लोकल’ कृषी तंत्रज्ञान घेऊन आलेल्या या प्रदर्शनात यंदा नव संशोधकांचे शेती व शेतीपूरक प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत.

शारदानगर येथे भरविलेल्या कृषिक प्रदर्शनाचा तिसरा दिवसही ‘हाऊस फूल’ होता. अश्व आणि पशूपक्षी प्रदर्शनामध्ये मारवाडी आणि भीमथडी उत्तम प्रतीचे अश्व येथे उपलब्ध आहेत. देखणे, दिमाखदार अश्व, खिल्लार कालवडी, विविध प्रकारचे पक्षी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

विशेषतः हैदराबादचे नवाब हसन बिनत्रिफ यांचा ११ कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हिंद केसरीचा किताब पटकाविलेल्या संतोष कोकणे यांच्या ‘सोन्या-मोन्या’ या खिलार बैलांच्या जोडीचे नवलही वेगळे आहे.

‘सोन्या-मोन्या मुका घे म्हटले की ते मुका घेतात, पाय जुळवून घे म्हणले की ते घेतात,’ असे श्री. कोकणे म्हणाले. लोहा (जि. नांदेड) तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांच्या राम व रावण या लालकंधारी जातीची बैलांची जोडीलाही पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT