Jackfruit Rate agrowon
ॲग्रो विशेष

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

Team Agrowon

Ratnagiri News : लांजातील फणस संशोधन केंद्राच्या रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली आहे. आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात ४० कोटींचा फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी मागणी केली आहे.

लांजा येथे ४० कोटींचा फणस संशोधन केंद्र प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला यापूर्वीच सादर केला आहे; मात्र, हा प्रस्ताव अद्याप निधीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

रखडलेल्या या प्रस्तावाबाबत लांजातील सिराज नेवरेकर यांनी आमदार शेखर निकम आणि आमदार राजन साळवी यांच्याशी संपर्क साधून रखडलेल्या फणस संशोधन केंद्रासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती.

बुधवारी (ता. ३) अधिवेशनामध्ये महायुती सरकारने सर्वसमावेशक मांडलेल्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना कोकणातील काही ठळक मुद्दे आमदार शेखर निकम यांनी मांडले. त्यामध्ये देवरूख येथील सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर येथे एनईपीसी सेंटर व विज्ञानविषयक लायब्ररी सुरू करण्यास पाठिंबा द्यावा, शासन मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, ही अभिनंदनीय बाब असून वर्ष दोन वर्षापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनादेखील त्याचा लाभ मिळावा, महात्मा गांधी जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवलेल्या क्रांतीकार्य निर्णयाबद्दल सरकारचे त्यांनी अभिनंदन केले.

कोकणात बांबू लागवडीसाठी प्राधान्य द्यावे व खैर वृक्ष लागवडीसाठी विशेष योजना राबवावी तसेच लांजा येथील फणस संशोधन केंद्र मंजूर व्हावे. कोकणातील नमन, जाखडी व खेळे या कलाकारांना मानधन व पेन्शन मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा. चिपळूण, खेड व राजापूर येथील नद्यांना पावसाळी येणाऱ्या पूर नियंत्रणासाठी निधी उभारावा.

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व गडगडी नदी लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाईपलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे, कोकणातील डोंगराळ भागातील धनगर समाजाचे पुनर्वसन व्हावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ व्हावी, आदी मागण्या आमदार शेखर निकम यांनी सभागृहात केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT