Kisan Agricultural Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Agriculture Exhibition : शेतकऱ्यांच्या स्वप्नांना दिशादर्शक ‘शेत हसल’

Agricultural Programs : ‘स्वयं टॉक्स’ आणि ‘ॲग्रोवन’तर्फे पुण्यातील किसान प्रदर्शनात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान कृषिविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : प्रतिकूल परिस्थितीत भरघोस उत्पादन घेत जागतिक बाजारपेठेपर्यंत मजल कशी मारायची, यावर ‘शेत हसल’ या कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळणार आहे. ‘स्वयं टॉक्स’ आणि ‘ॲग्रोवन’तर्फे पुण्यातील किसान प्रदर्शनात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान कृषिविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेती व्यवसायातील नामवंत तज्ज्ञांना, तुमच्या रोल मॉडेल्सना भेटण्याची तुम्हाला संधीही मिळणार आहे.

१२ डिसेंबर रोजी ४.३० ते ५.३० या वेळेत ‘ग्रामीण भागातील शेतीचा विकास’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. पशुधन तज्ज्ञ डॉ. जयंत खडसे आणि शेती संशोधन तज्ज्ञ डॉ. प्रमोदकुमार ताकवले मार्गदर्शन करतील. ते ‘संकरित गो पैदास’ आणि ‘वाडी प्रकल्प’ यावर माहिती देणार आहेत.

सायंकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान दुसरे सत्र ‘इंडियन फार्मर यू-ट्यूब चॅनेल’चे संस्थापक आकाश व संतोष जाधव घेणार आहेत. ‘शेती विकासासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा?’ याविषयी ते बोलणार आहेत. त्यांच्याच जोडीला कुक्कुटपालन क्षेत्रातील

उद्योजक सौरभ तापकीर हा २३ वर्षांचा तरुण सोशल मीडियामधून आपले काम कसे पोहोचवत आहे, हे सांगणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना तुम्ही तुमच्या मनातील प्रश्‍न वा शंका विचारू शकता. म्हणूनच शेतकरी, कृषी अभ्यासक आणि कृषी प्रेमींसाठी हा कार्यक्रम नक्कीच पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकवर / QR Code स्कॅन करून नाव नोंदवावे. http://shethustle.kisan.in/

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT