Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis: घोटभर पाण्यासाठी जिवाचा आटापिटा

Drinking Water Shortage: बारामती तालुक्यातील मूर्टी गावात पाणीटंचाईमुळे महिलांना खासगी विहिरीतून जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागत आहे. प्रादेशिक योजनेचे पाणी बंद झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. महिलांनी आणि ग्रामस्थांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Team Agrowon

Pune News: बारामती तालुक्यातील मूर्टी येथे मूर्टी प्रादेशिक योजनेचे पाणी बंद असल्यामुळे जिथे पाण्यासाठी कोणतीच योजना नाही, त्या ठिकाणी खासगी विहिरीतून जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळविण्यासाठी महिलांची कसरत सुरू आहे.

मूर्टी येथे पुरंदर पाझर तलावाच्या उद्भवावर गावठाण व चिरेखाणवाडी यांच्या पाणीपुरवठ्याच्या स्वतंत्र विहिरी आहेत. नैसर्गिक स्रोतांमुळे येथे तात्पुरते पाणी किमान अजून आठ- दहा दिवस चालेल इतके उपलब्ध आहे. त्यामुळे गावठाण व चिरेखाणवाडीस ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो.

ठरावीक अंतराने जरी पाणी मिळत असले, तरी सध्या पिण्याचे पाणी दिले जाते. मात्र बेलबाचा मळा, तांबेवाडी भोसलेवस्ती सानसाचा मळा याशिवाय चव्हाणवस्ती येथे पाणीपुरवठ्यासाठी कोणतेच माध्यम नाही. यापूर्वी वर्षभरापासून प्रादेशिक योजनेचे पाणी येथे मिळत होते. मात्र तीन महिन्यांपासून हे पाणी बंद आहे.

भरलेला हंडा घेऊन बाहेर पडताना विहिरीत पाय घसरून येथे अपघात होण्याचा धोका ही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी विहिरीतील पाणी काढणे धोकादायक आहे. संबंधित विभागाने ४० कोटी रुपये खर्च करून उभारलेली योजना ही सुरळीत चालू ठेवावी, अशी येथील महिलांची व नागरिकांची आग्रही मागणी आहे.

टॅंकरची मागणी

पाण्याचे विविध स्रोत उपलब्ध असल्याने या गावांना सरकारकडून टँकर मिळू शकत नाही. त्यामुळे येथे प्रादेशिक योजना सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना तातडीने व्हाव्यात, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्याकडे पक्षाच्या माध्यमातून टँकरची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT