VNMKV  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : वनामकृवित ५०० किलोवॉट सौर वीज प्रकल्पाची उभारणी

Solar System Update : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच इतर महाविद्यालयाच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौरवीज प्रकल्प उभारला जाणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच इतर महाविद्यालयाच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौरवीज प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून त्यामुळे विद्यापीठाच्या वीज देयकाच्या खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौरवीज निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचा प्रारंभ रविवारी (ता. १३) करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. मिश्रा बोलत होते. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, अपारंपरिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, उपअभियंता दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, ई-ऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी एस. एन. पांडे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सौरवीज प्रकल्पासाठी ठाणे येथील मे. ई-ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी राजस्थान सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लि. च्या माध्यमातून काम करते.

सुरुवातीला ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. भविष्यात ६४० किलोवॅटपर्यंत सौरवीज क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील २५ वर्षांसाठी प्रतियुनिट ४.९९ रुपये नुसार वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. याशिवाय, कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT