snake bite  Agrowon
ॲग्रो विशेष

Snake Bite : सहा महिन्यांत ९७ जणांना सर्पदंश

Paddy Harvesting : भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून भात काढणीची कामे जवळपास उरकली आहेत. भात शेतीच्या कामासाठी शेतकरी सर्वात जास्त वेळ शेतात राबत असल्याने याच काळात सर्पदंशाच्या घटना वाढ आहेत.

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून भात काढणीची कामे जवळपास उरकली आहेत. भात शेतीच्या कामासाठी शेतकरी सर्वात जास्त वेळ शेतात राबत असल्याने याच काळात सर्पदंशाच्या घटना वाढ आहेत.

मागील सहा महिन्यांत भोर तालुक्यात ९७ सर्पदंशाच्या घटना घडल्या असल्याची नोंद असून त्यातील ८९ जणांवर भोरमध्येच उपचार केले. आठ जणांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविले. सर्पदंशाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले.

भोर तालुका डोंगर झाडांनी व्यापलेला असून पाऊसही अधिक असतो. पावसावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. पावसाळ्यात जमीन पाण्याखाली जात असल्याने सरपटणारे प्राणी जमिनीवर येतात. त्यामुळे शेतीच्या पेरणी, लावणी व कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वाधिक सर्पदंश झाल्याचे निदर्शनास येते.

याच सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक २७ सर्पदंश हे जुलै महिन्यात झाले. तर जूनमध्ये १४, ऑगस्टमध्ये २०, सप्टेंबरमध्ये १३, आक्टोंबरमध्ये १५, तर नोव्हेंबरमध्ये ८ अशा एकूण ९७ जणांना सर्पदंश झाले आहेत.

यातील ९४ जणांनी उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यातील ८६ रुग्णांवर भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन (आरोग्य केंद्र भुतोंडे येथे एक व भोंगवली येथे दोन) अशा एकूण ८९ रुग्णांवर तालुक्यात उपचार केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Tariff Attack : अमेरिकेच्या व्यापार हल्ल्याला उत्तर काय?

Women In Farming : कोरडवाहू शेतीत महिलांचे स्थान काय?

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण चौथ्या दिवशी कायम; मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Cotton Farming Tips : कापसाची उत्पादकता वाढण्याचा प्राथमिक अंदाज

Indian Economy : कोट्यवधी नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल?

SCROLL FOR NEXT