Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Upsa Irrigation Scheme : बोदवड योजनेसाठी ९६ कोटी निधी

Agriculture Irrigation : बोदवड, मुक्‍ताईनगरसह जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील सहा तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी ९६ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : बोदवड, मुक्‍ताईनगरसह जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील सहा तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी ९६ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे दुष्काळी भागात गणल्या जाणाऱ्या बोदवडला लाभ होणार आहे.

या योजनेत दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जुनोने धरण व दुसऱ्या टप्पात जामठी धरण आहे. मात्र २०१७ ला राज्य मंत्रिमंडळाची जी एकला मान्यता मिळाली ती केवळ टप्पा एकला मिळाली आहे. त्यातच टप्पा एकचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले असून, टप्पा दोनच्या कामाला गती मिळणार आहे.

...असा होणार लाभ

जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील ५३ हजार ४४९ हेक्‍टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणारी ही उपसा सिंचन योजना आहे. या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यातील ३३ हजार ६६८ हेक्‍टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील १९ हजार ७८१ हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

दोन टप्प्यांत काम

सन २०११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १४ हजार ९९४ हेक्‍टर, दुसऱ्या टप्प्यात ३८ हजार ४५५ हेक्‍टर जमिनीवर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यात बोदवड, जामनेर आणि मुक्‍ताईनगर तालुक्‍याला लाभ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT