Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के पेरणी पूर्ण

Rabi Season 2024 : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पेऱ्याला पसंती दिली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ५६ हजार ३६४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र सरासरी २ लाख २७ हजार २१२.६२ हेक्टर असून, २ लाख १६ हजार ८२० हेक्टरवर म्हणजे एकूण ९५ टक्के रब्बीची पेरणी पूर्ण झाली.

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पेऱ्याला पसंती दिली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ५६ हजार ३६४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे.

कृषी विभागाने रब्बी हंगामामध्ये २ लाख २६ हार ७१८ हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, तीळ व अन्य रब्बी पिकांचे नियोजन केले होते; परंतु शेतकऱ्यांनी यंदा प्रथम प्राधान्य हे हरभरा पिकाला दिले आहे.

त्या खालोखाल जिल्ह्यात ५५ हजार ३९६ हेक्टरवर गव्हाचा पेरा होईल, असा अंदाज होता. त्या तुलनेत आतापर्यंत शेतकऱ्यांनी ४० हजार ७३०.५८ हेक्टवर गव्हाचा पेरा केला आहे. मक्याचेही क्षेत्र हे १० हजार १९५.८२ हेक्टरवर गेले.

तर रब्बी ज्वारीला शेतकऱ्यांनी पसंती दिली असून, आतापर्यंत ९ हजार १७३.५० हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय वेळीच उपलब्ध झाली.

नोव्हेंबर अखेरीस बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. यामध्ये आलू, जव, सरसो, कांदे, लसुण, राई, मटर यांसह बाजरी, ज्वारी, नाचणी, दादर, गहू, चने, हरभराआणि इतर पाले भाज्यांची लागवड करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT