Pune Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rainfall: मुळशी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस

Rainfall Record: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे मागील चोवीस तासांमध्ये ७.७२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. अधूनमधून पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी पश्चिम पट्ट्यात पाऊस कायम आहे. मुळशीनंतर लोणावळा घाटमाथ्यावर ६३ मिलिमीटर पाऊस पडला.

तर कुंडली ५०, वळवण ५४, शिरोटा २५, ठोकरवाडी २२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले चांगलेच प्रवाही झाले आहेत. मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक ४३ मिलिमीटर पाऊस झाला. तर वरसगाव २८, पानशेत २९ मिलिमीटर पाऊस झाला असून खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे धरणात १.३८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

नीरा खोऱ्यातील पावसाचे प्रमाण कमीअधिक स्वरुपात आहे. गुंजवणी धरणक्षेत्रात ४३ मिलिमीटर पाऊस पडला. तर पवना धरणक्षेत्रात ३०, वडिवळे २८ मिलिमीटर पाऊस झाला. कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, भाटघर, नीरा देवघर धरण क्षेत्रात हलक्या सरी कोसळल्या. तर वीर धरण क्षेत्रात पावसाची उघडीप होती. कुकडी खोऱ्यात असलेल्या डिंभे धरणक्षेत्रात अवघा १८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या.

तर घोड, विसापूर, उजनी धरणक्षेत्रात पावसाची उघडीप असून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. परंतु नाझरे, कळमोडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. इतर अनेक धरणे ७५ टक्क्यांपर्यंत तर काही त्याहून अधिक भरली आहेत. त्यामुळे काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT