Koyana Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Generation : कोयनेतून ९३३ दशलक्ष किलोवॉट वीजनिर्मिती

Koyana Dam : कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यातून ९३३ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती झाली.

अभिजीत डाके

Sangli News : कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यातून ९३३ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती झाली. ती गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्यावर्षी दुष्काळाचे सावट होते, परिणामी विजेची मागणी पावसाळ्यातदेखील अधिक होती. परिणामी, जून ते ऑक्टोबर वीजनिर्मिती अधिक करावी लागली होती. यंदा मागणी कमी असल्याने विनावापर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा टक्का अधिक आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी प्रचंड पाऊस झाला. कोयना धरण क्षेत्रात ५७८७ मिलिमीटर, नवजा ६८६२ मिलिमीटर, महाबळेश्वर ६६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातील धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी होता. पाणीपातळी खालावली होती. १७.८७ टीएमसी साठा असताना पावसाला सुरवात झाली.

धरण शंभर टक्के भरले. धरणातील एकूण पाण्याची आवक १७७.८४ टीएमसी इतकी झाली. पैकी सुमारे ५९ टीएमसी इतके पाणी दरवाजातून सोडले. हे संपूर्ण पाणी हे विनावापर खाली सोडले. त्याचवेळी विजेच्या मागणीच्या आधारावर सुमारे १८ टीएमसी इतके पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यात पोफळीतून ३४५.९१०, स्टेज चारमधून ३४४.५००, केडीपीएचमधून ४८.८३०, अलोरे दरवाजातून १९३.९९२ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली. परिणामी, यंदा पावसाळ्यात मागणीपेक्षा अधिक वीजनिर्मिती शक्य झाली.

गतवर्षी वीजनिर्मिती अधिक

गत वर्षी राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही दुष्काळ जाहीर केला होता. टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सलग चालवण्याची वेळ आली होती. कोयनेतून त्यासाठी अतिरिक्त वीजनिर्मिती करावी लागली. गत वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातील पाणीसाठी १७.६४ टीएमसी इतकाच होता. धरणातील एकूण पाणीसाठा ९१ टीएमसीपर्यंत राहिला. एकूण पाण्याच्या आवक यंदाच्या तुलनेत तब्बल ७० टीएमसी कमी होती; म्हणजेच केवळ १०७ टीएमसी पाणी धरणात आले होते.

सिंचनासाठी एक टीएमसी

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडला, मात्र काही दुष्काळी टापूत पाऊस सुरू व्हायला उशीर लागला. म्हैसाळ उपसा सिंचनसारखी योजना जतसाठी चालवावी लागली. त्यामुळे धरणातून सुमारे १.१६ टीएमसी इतका पाणीसाठा या योजना चालवण्यासाठी वापरण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT