Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील पाणीसाठा ७२ टक्क्यांवर

Water Stock Marathwada : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७९ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये असलेला उपयुक्त पाणीसाठा आता ७२.७५ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७९ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये असलेला उपयुक्त पाणीसाठा आता ७२.७५ टक्क्यांवर आला आहे.

आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यात ११ मोठ्या प्रकल्पातील ८३.२० टक्के, मध्यम ७५ प्रकल्पात ६९.१३ टक्के, ७५१ लघु प्रकल्पात ५०.९३ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्या २६.२७ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात असलेल्या ८९.४९ टक्के पाणी साठ्याचा समावेश आहे.

एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ७ प्रकल्पात २५ ते ५० टक्के, २४ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर ३९ प्रकल्पांत ७५ टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण ७५१ पैकी ८१ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, १४३ प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान, २१९ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर २२८ लघु प्रकल्प ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

२१ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील १९ लघु व २ मध्यम मिळून २१ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या दोन मध्यम प्रकल्पात जालना जिल्हा व धाराशिव मधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

दुसरीकडे पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या १९ लघु प्रकल्पात जालना जिल्ह्यातील १०, धाराशिव जिल्ह्यातील ७ तर नांदेड जिल्ह्यातील व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील एक लघू प्रकल्प कोरडा पडला असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सिद्धेश्वरमध्ये २४ टक्केच उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सर्वात मोठ्या जायकवाडीत ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरीत ९३ टक्के,माजलगावात ६८ टक्के, मांजरात ८७ टक्के, उर्ध्व पेनगंगा ८५ टक्के, निम्नतेरणामध्ये ९१ टक्के, निम्न मनारमध्ये ७४ टक्के, विष्णुपुरीत ८७ टक्के, निम्न दुधनांमध्ये ६१ टक्के, सीना कोळेगावमध्ये ८४ टक्के, तर सिद्धेश्वरमध्ये सर्वात केवळ २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT