Pune News
Pune News  Agrowon
ॲग्रो विशेष

Disaster Management : मावळमध्ये आपत्ती मित्र प्रशिक्षणात ८७ जण सहभागी

Team Agrowon

Pune News : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (National Disaster Management Authority), राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षण देण्यात आले.

यामध्ये एकूण ८७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २८ फेब्रुवारी या काळात हे प्रशिक्षण देण्यात आले.

मावळ आणि मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र यांचा प्रशिक्षणात सहभाग आहे.

बारा दिवसांच्या या प्रशिक्षणात आपत्ती व आपत्तीचे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भूकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छ्वास, आग व आगीचे प्रकार, व्हर्टिकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जाऊन मदतकार्य करून जीवित हानी टाळू शकतात.

मानवी कुबडी, पाठीवर सरळ घेणे, अग्निशमन दल कर्मचारी उचल, अग्निशमन दल रांगणे, जिन्यावरून खाली आणणे, दोन, तीन, चार हातांची बैठक, विविध आपत्कालीन स्ट्रेचर इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर, सायली चव्हाण आणि ओंकार पोखरकर यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT