PM Kisan Installment agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : लवकरच ८५ लाखांवर शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’चा हप्ता

PM Kisan 15th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतून राज्यात ८५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच १५ वा हप्ता मिळणार आहे.

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतून राज्यात ८५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच १५ वा हप्ता मिळणार आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात बुधवारी (ता. १५) हप्ता जमा होण्याची शक्यता गृहीत धरीत सध्या राज्यभर पडताळणीची कामे सुरू आहेत.

चौदाव्या हप्त्यापोटी राज्यात ८५.६० हजार कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २७ जुलै रोजी एक हजार ८६६ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील १५ व्या हप्त्यापोटी प्रत्येकी दोन हजार रुपयांचे मानधन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले जाणार आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंधराव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र शासनाकडून सध्या आरएफटी (रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्स्फर) प्रणालीवर काम केले जात आहे. आरटीएफ प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या राज्यात तपासणीसाठी पाठविल्या आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून (एसएओ) या याद्यांची तपासणी सध्या सुरू आहे.

चौदावा हप्ता जमा करताना संबंधित शेतकऱ्यांची ई-केवायसी सक्तीने पाहिली गेली नव्हती. मात्र नोव्हेंबरचा हप्ता देताना ई-केवायसीला महत्त्व दिले जात आहे. आतापर्यंत राज्यातील ८८ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न असल्याचे या योजनेत नोंदणीकृत झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी अद्यापही संलग्नता, ई-केवायसी केली नसल्यास बँकेत संपर्क करावा, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्राचा १५ वा हप्ता मिळताच राज्य सरकारकडून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

राज्याच्या मान्यतेशिवाय ‘एफटीओ’ नाही

‘‘‘एसएओं’कडून याद्यांची तपासणी झाल्यानंतर जिल्हास्तरावर कामकाज थांबविले जाईल. काही जिल्ह्यांमध्ये या कामाला उशीर होण्याची शक्यता असते. अशावेळी कृषी आयुक्तालयाकडून पुढाकार घेत नियोजनाचा आढावा घेतला जातो व प्रक्रिया पूर्णत्वाला नेली जाते.

कारण राज्याकडून याद्यांमधील नावे अंतिम केल्याशिवाय दोन हजार रुपये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्याच्या पुढच्या एफटीओ (फंड ट्रान्स्फर ऑर्डर) कामाला मान्यता दिली जात नाही,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

थोडक्यात महत्त्वाचे...

- आरएफटी प्रणालीची कामे सध्या युद्धपातळीवर

- १५ वा हप्ता देताना ई-केवायसीला महत्त्व

- ८८ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न

- केंद्राच्या १५ व्या हप्त्यानंतर राज्य सरकारकडून ‘नमो’चा दुसरा हप्ता मिळणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT