PM Kisan : पीएम किसानबाबत महत्वाची अपडेट, बोगस शेतकऱ्यांवर होणार कारवाई

PM Kisan : पीएम किसान अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ६ हजार देणाऱ्या निधीबाबात महत्वाची माहिती समोर आली आहे.
PM Kisan
PM Kisanagrowon
Published on
Updated on

PM Kisan News : २०१९ पासून पीएम किसान अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ६ हजार देणाऱ्या निधीबाबात महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान पीएम किसानचा १५ वा हफ्ता लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पीएम किसानचा बेकायदेशीर हफ्ता घेतलेल्या बोगस शेतकऱ्यांकडून वसुलीची मोहिम राबवली आहे.

सरकारने नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून अवैद्यरित्य पीएम किसानचे पैसे जात असल्याची माहिती जाहीर केली होती. दरम्यान यावर सरकारने ऑडिट करत देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात. सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०२३ पासून वसूलीसाठी अभ‍ियान सुरू आहे.

PM Kisan
PM Kisan Installment : पीएम किसान अंतर्गत ६ ऐवजी ८ हजार मिळणार? निवडणुकांच्या तोंडावर निर्णयाची शक्यता

दरम्यान पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये येतात. या योजनेत लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ई-केवायसीदेखील करण्यात येत आहे. पीएम क‍िसान न‍िध‍ीअंतर्कगत २७ जुलै रोजी खातेदारांना १४व्या हप्ता देण्यात आला होता. आपल्याला १५वा हप्ता घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आपले ई-केवाईसी असणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यांनी PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेले पात्र शेतकरी आपले आधार कार्ड घेऊन ‘ई सेवा केंद्रला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी दरम्यान पीएम किसानचा १५ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com