Mulberry Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : तुती लागवडीसाठी ८०१ एकरांवर नोंदणी

Mahareshim Abhiyaan : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘महारेशीम अभियान २०२४’ अंतर्गत रेशीम विभागाकडे ८०१ एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘महारेशीम अभियान २०२४’ अंतर्गत रेशीम विभागाकडे ८०१ एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील ४४३ एकर व हिंगोली जिल्ह्यातील ३५८ एकर नोंदणीचा समावेश आहे. केवळ या दोन जिल्ह्यात रेशीम विभागाने तुती लागवड नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

कृषी विभाग व ग्रामपंचायत विभागाकडे तुती लागवडीसाठी नोंदणी झाली नसल्यामुळे त्यांचे उद्दिष्ट कागदावरच आहे. दरम्यान, या जिल्ह्यात तुती रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे येत्या जूनमध्ये नवीन तुती लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध होतील, असे रेशीम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बदलत्या हवामान स्थितीत पारंपरिक शेती पिकाच्या उत्पन्नाची जोखीम कमी करून शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. रेशीम उद्योगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने हे महारेशीम अभियान राबविले जाते. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘महारेशीम अभियाना’मध्ये परभणी जिल्ह्यात १ हजार १०० एकर व हिंगोली जिल्ह्यात ७५० एकर असे एकूण १ हजार ८५० एकर तुती लागवडीसाठी नोंदणीचे उद्दिष्ट होते.

परभणी जिल्ह्यात रेशीम विभागाला ३५० एकर, कृषी विभागाला ४०० एकर, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागाला ३५० एकर असे एकूण १ हजार १०० एकरांवर तुती लागवड नोंदणीचे उद्दिष्ट होते. परंतु केवळ रेशीम विभागाकडे ४४३ एकरांवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. कृषी व ग्रामपंचायत विभागाकडे नोंदणी झालेली नाही. परभणी जिल्ह्यात जुनी व नवीन मिळून ५७९ शेतकऱ्यांकडे ६१८ एकरांवर तुती लागवड आहे, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. आर. कदम यांनी सांगितले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील तुती लागवड नोंदणी स्थिती (एकरांत)

तालुका नोंदणी

परभणी ३९

जिंतूर ६७

सेलू ९

मानवत ८५

पाथरी १५

सोनपेठ ५

गंगाखेड ५१

पालम १५

पूर्णा १५७.

हिंगोली २५

कळमनुरी ७५

वसमत १००

औंढा नागनाथ १००

सेनगाव ५८

हिंगोली जिल्ह्यात ४०० एकर लागवड

‘‘हिंगोली जिल्ह्यात रेशीम विभागाला २५० एकर, कृषी विभागाला ३०० एकर, जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत विभागाला २०० एकर असे एकूण ७५० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु केवळ रेशीम विभागा अंतर्गत ३५८ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी झाली. जिल्ह्यात जुनी व नवीन मिळून सुमारे ४०० एकर तुती लागवड आहे,’’ असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT