Red Chili Market Agrowon
ॲग्रो विशेष

Red Chili Market : लाल मिरचीला ८००० ते २०,००० रुपयांचा दर

Red Chili Rate : धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मोंढा बाजारात सध्या गावरान लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मोंढा बाजारात सध्या गावरान लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता. १४) बाजारात लाल मिरचीची ५५० पोते आवक झाली. या मिरचीला प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल २०,००० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली.

तेलंगण राज्याच्या सीमेजवळ येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर या तालुक्यांतील शेतकरी गावरान मिरचीची लागवड करतात. लाल भडक रंग तसेच चवीला प्रसिद्ध असलेल्या या मिरचीला महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठी मागणी असते.

या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात चांगली मागणी असते. सध्या या भागातील लाल मिरचीची तोडणी सुरू आहे. या मिरचीचे मार्केट धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या ठिकाणी आवक सुरू झाली आहे.

बुधवारी (ता. १४) बाजारात ५५० पोते लाल मिरचीची आवक झाली. यास किमान आठ हजार शंभर, कमाल वीस हजार रुपये, तर सरासरी १५ हजार रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बाजारात सध्या हरभऱ्या‍लाही चांगला भाव मिळत आहे. बुधवारी १४२० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यास कमाल ६२३५, तर किमान ५८०० रुपये दर मिळाला. नवीन लाल तुरीची आवक १२० क्विंटल झाली. यास कमाल ९४९५, तर किमान ८७६० रुपये दर मिळाला. पांठरी तुरीची २५ क्विंटल आवक झाली. यास किमान ९१००, तर कमाल ९४९५ रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT