Kolhapur ZP Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur ZP Scheme : कडबाकुट्टी मशीन आणि शेळ्यांसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान, इथे करा अर्ज

Kolhapur Animal Husbandry Department : योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर दिनांक १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी दिली.

sandeep Shirguppe

Kolhapur ZP News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर दिनांक १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील १०० पशुपालकांना १० हजार रुपयांच्या मर्यादेत ५० टक्के अनुदानावर २ एच पी कडबाकुट्टी मशिन वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पशुपालकाकडे किमान ५ जनावरे असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील ७२ विधवा, परितक्त्या, दारिद्रय रेषेखालील महिलांना १३ हजार ८०५ रुपयांच्या मर्यादेत ७५ टक्के अनुदानावर २ शेळींचा गट वाटप करण्यात येणार आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Tourism: उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांत 'गो पर्यटन' बनविण्याची तयारी, काय आहे योगी सरकारची 'ही' योजना?

Zilla Parishad Elections: जालना ‘झेडपी’ सदस्यांचे आरक्षण निश्चित

Coal Ash: कोळसा खाणीतील राखेमुळे पडीक जमिनीच्या पुनरुज्जीवनाचे तंत्र

Women Empowerment: महिलांच्या आर्थिक सक्षमतेकडे द्या लक्ष

APJ Abdul Kalam Jayanti: कलाम यांचा शाश्‍वत शेती विचार

SCROLL FOR NEXT