Bhima River Barrage Agrowon
ॲग्रो विशेष

Bhima River Barrage : भीमेवरील वडापूर बॅरेजसाठी ७५ कोटींचा प्रस्ताव

Bhima River : भीमा नदीवरील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे बॅरेज बांधला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दीड हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळणार आहे.

Team Agrowon

Solapur News : भीमा नदीवरील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे बॅरेज बांधला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दीड हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी बॅरेज उभारणीला प्रशासकीय मान्यता मिळाली, पण पूर्वीच्या आराखड्यात बदल करून नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला.

राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्याची पडताळणी करून तो प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठविला आहे. आता तो प्रस्ताव शासनाला जाईल. त्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील भीमा, सीना व माण नदीवर प्रत्येकी २४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्या सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे झाल्यावर कोणत्या ठिकाणी बॅरेजची गरज आहे, ही माहिती समोर येईल.

पण, अद्याप बंधाऱ्यांच्या सर्व्हेला देखील मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, भीमा नदीवरील वडापूर येथे बॅरेजसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या बॅरेजमुळे तालुक्यातील अंदाजे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. वडापूर बॅरेजसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्या प्रस्तावाची पडताळणी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच केली आहे.

त्यांच्याकडून तो प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर वडापूर बॅरेज उभारणीला सुरवात होईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

शिरापूर, बोपले, रिधोरेचा सर्व्हे पूर्ण

सीना नदीवरील शिरापूर, बोपले (ता. मोहोळ) व रिधोरे (ता. माढा) येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यातून अंदाजे चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तिन्ही ठिकाणचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्याचा प्रकल्प अहवाल देखील तयार करण्यात आला आहे.

त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी बॅरेजमध्ये अडवून त्या परिसरातील शेतीला आधार देण्यासाठी प्रशासकीय मान्यता जरुरी असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT