Galmukt Dharan Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukta Dharan Yojana : बार्शी तालुक्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून ७ कोटी ४० लाख अनुदान

Galmukta Dharan Yojana Subsidy : बार्शी तालुक्यातील ३४ जलसाठ्यातील ३४ लाख १६ हजार घनमीटर काढलेल्या गाळाचे २ हजार ७०१ गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांना ७ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, ग्रामपंचायतीमार्फत या अनुदानाचे वाटप होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : बार्शी ः बार्शी तालुक्यातील ३४ जलसाठ्यातील ३४ लाख १६ हजार घनमीटर काढलेल्या गाळाचे २ हजार ७०१ गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांना ७ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, ग्रामपंचायतीमार्फत या अनुदानाचे वाटप होणार आहे.

आमदार दिलीप सोपल यांनी या अनुदानाची माहिती दिली. आमदार सोपल म्हणाले, की धरण, जलसाठ्यामधून गाळ काढण्यात आलेल्या व पूर्ण झालेल्या कामांकरिता जलयुक्त शिवार अभियान २.० योजनेच्या लेखाशिर्षातून तलावातील काढलेल्या गाळाचे अशासकीय संस्थांचे व शेतकऱ्यांचे अनुदानाचे देयक अदा करण्यासाठी नुकतेच आदेश देण्यात आलेले आहेत.

बार्शी तालुक्यामधील ल. पा. तलाव कळंबवाडी (भाग-२), ल. पा. तलाव वैराग (भाग-२), मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- २) (ब),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- ४), ल.पा. तलाव तावडी (भाग-२),ल. पा. तलाव ममदापूर (भाग-२),ल. पा. तलाव पाथरी,ल. पा. तलाव पाथरी (भाग-२),ल. पा. तलाव पाथरी (भाग-३),ल.पा. तलाव, बाभूळगाव , ल . पा. तलाव बाभूळगाव (भाग-२), ल.पा. तलाव बाभूळगाव (भाग-३),ल. पा. तलाव पाथरी (भाग-४),ल. पा. तलाव शेळगाव (आर) (भाग-३) ,मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग-७), ल. पा. तावडी,ल. पा. तावडी (भाग-३),ल. पा. झाडी

बोरगाव ,ल. पा. तलाव झाडी बोरगाव (भाग-२),ल.पा. तलाव कोरेगाव,ल. पा. तलाव काटेगाव (भाग-२),ल.पा. तलाव वैराग,ल. पा. तलाव गोरमाळे (भाग-२ ) , मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- ३),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- २) (अ),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.), (भाग-५), मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग-६), ल. पा. तलाव कोरेगाव (भाग-२),ल.पा. तलाव शेळगाव आर,ल. पा. तलाव शेळगाव (आर) (भाग-२),

मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-२), मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-३), मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-४),ल.पा. तलाव ममदापूर या
तलावाच्या जलसाठ्यामधून काढलेल्या गाळामधून शेतक-यांनी सदरचा गाळ
 वाहून नेऊन त्यांचे शेतात पसरला आहे, लवकरच पात्र शेतकरी आणि संस्थांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम वितरित करण्यात येणार आहे, असेही आमदार सोपल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT