Rain Update
Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ७२ मिमी पाऊस

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत पावसाचा जोर (Rain Force In Ratnagiri) होता; मात्र मंगळवारी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली.जिल्ह्यात सरासरी ७२.६७ मिमी पाऊस पडला. रत्नागिरी, गुहागर, लांजा, राजापूर आणि दापोली तालुक्यांना पावसाने झोडपून (Heavy Rain) काढले. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली, तर राजापूरमधील कोदवली, अर्जुना नदीचे पाणी वाढले होते. (Latest Rain Update Maharashtra)

जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मंगळवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत मंडणगड ८५ मिमी, दापोली ५८ मिमी, खेड ३९ मिमी, गुहागर ९० मिमी, चिपळूण ९९ मिमी, संगमेश्वर ६९ मिमी, रत्नागिरी ३८ मिमी, लांजा ११६ मिमी, राजापूर ६० मिमी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. लावणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत दहा टक्के कामे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT