Bank Representatives Agrowon
ॲग्रो विशेष

Bank Representatives : बॅंकांच्या ७० हजार व्यवसाय प्रतिनिधींनी काम थांबवले

Team Agrowon

Pune News : ग्रामीण भागासह शाखा नसलेल्या भागांमध्ये बॅंकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी राज्यात विविध बॅंकांनी नियुक्त केलेल्या अडीच लाख व्यवसाय प्रतिनिधींपैकी ७० हजार प्रतिनिधींनी कामे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एलआयसीप्रमाणेच बॅंकांनीदेखील स्वतःचे एजंट नेमल्यास गावोगावी बॅंकिंग सेवा उपलब्ध होतील. तसेच, बॅंकांपर्यंत जाऊ न शकणारे ग्राहक या एजंटांच्या मदतीने आर्थिक सेवा मिळवतील, असा हेतू ठेवत २००६ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांना खासगी व्यवसाय प्रतिनिधी नियुक्त करण्यास मान्यता दिली. या प्रतिनिधींना मर्यादित सेवा पुरविण्यासाठी काही अधिकार देण्यात आले आहेत. ग्राहकाचे खाते उघडून देणे, या खात्यांमध्ये व्यवहार करण्यास मदत करणे, कमी रकमेच्या कर्जप्रस्तावांची हाताळणी करणे असे अधिकार या प्रतिनिधींना देण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची मुले, बचत गटांच्या महिला, सामाजिक कामाची आवड असलेले कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था तसेच काही उच्चशिक्षित बेरोजगारदेखील बॅंकांचे व्यवसाय प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. राज्यात अडीच लाखांच्या आसपास बॅंक व्यवसाय प्रतिनिधी नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यात त्यात ८० हजार महिलांचा समावेश होता. परंतु, यातील केवळ पावणेदोन लाख प्रतिनिधी कार्यरत आहेत.

सहकार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने आणलेली व्यवसाय प्रतिनिधींची संकल्पना उत्तम आहे. तथापि, या प्रतिनिधींना पुरेशा सुविधा नाहीत. तसेच, त्यांच्यासोबत समन्वय ठेवणारी व त्यांना वेळोवेळी येणाऱ्या समस्या सोडविणारी यंत्रणा काही बॅंकांना उभारली नाही. परिणामी, राज्यात जवळपास ७० हजारांहून अधिक प्रतिनिधी बॅंकांची कामे करणे थांबविले आहे. या प्रतिनिधींना पुन्हा काम करण्यास प्रोत्साहन देणे तसेच नव्याने प्रतिनिधी नियुक्त करण्याचे मोठे आव्हान बॅंकांसमोर आहे.

एका राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकाने सांगितले की, बॅंकांना प्रत्येक काम जपून करावे लागते. त्यामुळे कायम कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्याकडे बॅंकांचा कल असतो. व्यवसाय प्रतिनिधी हा खासगी असल्यामुळे व त्यावर बॅंकेचे नियंत्रण नसल्यामुळे बॅंका या प्रतिनिधींवर फारसे विसंबून राहू इच्छित नसतात. अर्थात, रिझर्व्ह बॅंकेला बॅंकांची ही भूमिका मान्य नाही. काम करणे बंद केलेल्या व्यवसाय प्रतिनिधींना शोधा आणि त्यांना पुन्हा सक्रिय करा, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आहेत. त्यामुळे या प्रतिनिधींना पुन्हा कामाच्या प्रवाहात आणण्यासाठी बॅंकांचे प्रयत्न सुरू आहेत.

कमी मेहनताना हेच मुख्य कारण

व्यवसाय प्रतिनिधींना आकर्षक मेहनताना मिळत नसल्यामुळेच अनेक जण बॅंकांचे काम थांबवतात. तसेच, भाड्याचे खासगी ही व्यवसाय केंद्रे असतात. भाडेवाढ पुरेशी न मिळाल्यामुळे केंद्र बंद पडते. तसेच, इंटरनेट सेवा नसल्याने व नक्षलग्रस्त भागात सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे बॅंकांचे व्यवसाय प्रतिनिधी काम करण्यास नकार देतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून द्या

Onion Import : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये, अशी सरकारची नीती; कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Soybean Rate Issue : सोयाबीन पिकाला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी

Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; पिकांना फटका

SCROLL FOR NEXT