Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Lightning Strike : महागावात वीज पडून ७० क्विंटल कापूस खाक

बेलदरी येथील जयवंत गुलाबसिंग आडे यांनी त्यांच्या शेत सर्वे नंबर ५० मधील घरातदेखील ७० क्विंटल कापूस साठवून ठेवला होता.

Team Agrowon

Yavatmal Fire News : दरवाढीच्या अपेक्षेने शेतातील घरात साठवून ठेवलेला कापूस वीज पडून भस्मसात झाल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे घडली. या घटनेत ७० क्विंटल कापूस जळल्याची (Cotton Fire) माहिती शेतकऱ्याने दिली.

सध्या बाजारात कापसाला ७६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर आहे. गेल्या हंगामात कापसाचे दर ११ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. यंदादेखील हंगामाअखेर कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्याच कारणामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे.

बेलदरी येथील जयवंत गुलाबसिंग आडे यांनी त्यांच्या शेत सर्वे नंबर ५० मधील घरातदेखील ७० क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. शनिवारी (ता. १८) रात्री या घरावर वीज पडल्याची माहिती आहे.

रविवारी (ता. १९) सकाळी सालगडी सुरेश जाधव नियमित कामे करण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी घरातून धूर निघत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरडत केली असता नजीकच्या शेतातील शेतकरी तसेच गावकरी शेतात धावून आले.

त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ७० क्विंटल कापूस जळून खाक झाला होता. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कापूस साठवणूक केलेल्या घरापासून काही अंतरावर बैलजोडी बांधलेली होती ती मात्र सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT