Jharkhand Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीत पाच वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान

Vidhansabha Election Update : झारखंडमधील विधानसभेच्या ३८ मतदार संघांमध्ये बुधवारी (ता. २०) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६८ टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Team Agrowon

Ranchi News : झारखंडमधील विधानसभेच्या ३८ मतदार संघांमध्ये बुधवारी (ता. २०) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६८ टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

झारखंड राज्यातील १२ जिल्ह्यांतील १४,२१८ बूथवर बुधवारी मतदान झाले. जामतारा जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१६ टक्के मतदान झाले, त्यानंतर पाकूरमध्ये ७५.८८ टक्के, देवघरमध्ये ७२.४६ टक्के आणि रांचीमध्ये ७२.०१ टक्के मतदान झाले.

रामगढमध्ये ७१.९८ टक्के, दुमका ७१.७४ टक्के, गोड्डा ६७.२४ टक्के, साहेबगंज ६५.६३ टक्के, गिरिडीह ६५.८९ टक्के, हजारीबाग ६४.४१ टक्के आणि धनबाद ६३.३९ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोकारो जिल्ह्यात सर्वांत कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.

६०.७९ लाख महिला आणि १४७ तृतीय-लिंग मतदारांसह एकूण १.२३ कोटी मतदारांनी मतदान केले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.बुधवारी झालेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर पहिल्या टप्प्यात ४३ विधानसभा मतदार संघातील उमेदवार रिंगणात होते.

गोड्डा, देवघर, दुमका, जामतारा, साहिबगंज आणि पाकूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ३८ पैकी अठरा मतदार संघ संथाल परगणा प्रदेशात आहेत. उर्वरित १८ जागा उत्तर छोटानागपूर विभागात आणि दोन दक्षिण छोटानागपूर विभागात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT