Farmers Death Maharashtra  Agrowon
ॲग्रो विशेष

Amaravati Farmers Death : चार महिन्यांत ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmers Issue : तथापि प्रशासनाने यातील नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या असून ५४ प्रकरणांत चौकशीच झालेली नाही. वर्ष २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Team Agrowon

Amaravati News : चालू वर्षात गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केली आहे. यामध्ये बहुतांश सोयाबीन उत्पादक व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सोयाबीनची शासकीय खरेदी झाली असली तरी त्याचा फारसा लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. खुल्या बाजारात हमीदरापेक्षाही कमी भावात विक्री करावी लागल्याने कर्जफेडीच्या चिंतेने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे वास्तव समोर आले आहे.

तथापि प्रशासनाने यातील नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या असून ५४ प्रकरणांत चौकशीच झालेली नाही. वर्ष २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मार्च व एप्रिल ही दोन महिने शेतीमाल विक्री व पीककर्ज भरण्याचा कालावधीतील आहेत. तर जानेवारी व फेब्रुवारीत रब्बी हंगामातील पीक घरी येण्यास प्रारंभ होतो. आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत प्रत्येकी २१ आहेत.

यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा व गव्हाचे उत्पादन सरासरी कमी राहिले आहे. तर खरीप हंगामात सोयाबीन, कापसाला खुल्या बाजारात भाव मिळालेला नाही. हमीदरापेक्षाही कमी दराने सोयाबीन शेतकऱ्यांना विकावा लागला आहे. सोयाबीनची शासकीय खरेदी हमीदराने ‘नाफेड’मार्फत तर कापसाची ‘सीसीआय’कडून करण्यात आली असली तरी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना शासकीय खरेदीचा फारसा लाभ मिळाला नाही.

कापसाच्या शेतकऱ्यांना हमीदर मिळाला असला तरी बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस प्रतवारीच्या नावाखाली परत करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर बॅंक व सावकारांचे कर्ज चुकविण्यासाठी अडचणी गेल्यात.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन उत्पादक व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ५४ प्रकरणात प्रशासनाकडून चौकशीच झालेली नाही. चौकशी करण्यात आलेली नऊ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. जानेवारी व फेब्रुवारीतील प्रत्येकी दोन प्रकरणे अपात्र ठरली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT