Gopinath Munde accident insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Insurance : ‘अपघात विम्या’चा ६६ शेतकऱ्यांना लाभ

Agriculture Scheme : जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ६६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ६६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यातून १ कोटी २८ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले. १११ प्रस्तावांचे सव्वादोन कोटी रुपये प्रक्रियेत आहेत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मागील वर्षी दहा तालुक्यांतून २२४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी ६६ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरित १११ प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. शेतीत काम करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांना सामोरे जावे लागते.

शेतीमध्ये अहोरात्र काम करताना काही प्रसंग शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. शेतात काम करताना कधी मानवी, तर कधी नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या जीवास धोका निर्माण होतो. अशावेळी संबंधित कर्त्या शेतकऱ्यांचे काही बरे-वाईट झाल्यास संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. त्यामुळे राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली.

खातेदार असलेल्या किंवा खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले, तर या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतात.

रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना विषबाधा, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांचा हल्ला, दंगल, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का अशा नैसर्गिक अपघातांमुळे तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे येणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते.

गत वर्षी १५४ प्रस्ताव मंजूर होऊन त्यातून ३ कोटी चार लाख रुपये अदा केले. प्रस्ताव येईल तशी तपासणी करून मंजुरी दिली जाते.
- विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT