Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : चालू हंगामात नांदेड विभागात ६३ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Crushing : चालू गाळप हंगामात नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी १७ जानेवारीअखेर ६३ लाख ३४ हजार टन ऊस गाळप केला आहे.

Team Agrowon

Nanded News : चालू गाळप हंगामात नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी १७ जानेवारीअखेर ६३ लाख ३४ हजार टन ऊस गाळप केला आहे. नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे सहसंचालक सचिन रावल यांनी ही माहिती दिली आहे.

नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २९ कारखान्यांनी आतापर्यंत ५८ लाख ४८ हजार ९१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. चालू हंगामात विभागाचा सरासरी साखर उतारा ८.९८ टक्के राहिला आहे.

विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये सध्या २९ कारखाने सुरू आहेत. यामध्ये १० सहकारी तर १९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक ११ कारखाने एकट्या लातूर जिल्ह्यात सूरू आहेत.

१७ जानेवारीअखेर या कारखान्यांनी सुमारे ६३ लाख ३४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. यापासून ५८ लाख ४८ हाजर ९१५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती कारखाने

विभागातील परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू असून हे सर्व कारखाने खासगी आहेत. तर नांदेडमध्ये सहा कारखाने सुरू आहेत. यामध्ये पाच खासगी तर एक सहकारी कारखाना आहे.

हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी आणि तीन सहकारी असे पाच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. तसेच लातूरमध्ये सर्वाधिक ११ कारखान्यांचेही गाळप सूरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT