Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : परभणीत ६२.०५ टक्के, तर हिंगोलीत ५३.८१ टक्के रब्बी पेरा

Team Agrowon

Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात आजवर नापेर राहिलेल्या क्षेत्रावर आता पेरणी करता येणार आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील रब्बीच्या पेऱ्यात वाढ होणार आहे.

दरम्यान, मंगळवार (ता. २८) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ३१ हेक्टर (६२.०५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ९५ हजार १८९ हेक्टर (५३.८१ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण २ लाख ६३ हजार २२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. २८)पर्यंत रब्बीच्या सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर पैकी १ लाख ६८ हजार ३१ हेक्टरवर (६२.०५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ६५ हजार १७ हेक्टरवर (५७.४९ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ११ हजार ८२२ हेक्टर (३०.०८ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ८९ हजार ३२२ हेक्टर (७९.६३ टक्के), तर करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार १८ हेक्टर (३०.२२ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता. २८) पर्यंत रब्बीच्या सरासरी १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर पैकी ९५ हजार १८९ हेक्टर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ३ हजार ८८३ हेक्टर, गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी १० हजार ५१५ हेक्टर पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ८० हजार ४५० हेक्टर पेरणी झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये पाऊस नसल्यामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नव्हता. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रातील मोठे क्षेत्र नापेर राहिले होते. परंतु मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जमिनीत ओलावा उपलब्ध झाल्यामुळे आता पेरणी करता येईल. त्यामुळे ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (मंगळवार,ता.२८ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ३६९१४ ६३.७५

जिंतूर ५३७३० ३४२५८ ६३.७६

सेलू ३३५६१ १८५७५ ५५.३५

मानवत १६११९ ११८२३ ७३.३५

पाथरी १७०७२ १०४५९ ६१.२६

सोनपेठ १५६९८ १३००३ ८२.८४

गंगाखेड ३२०८६ १४९८८ ४६.७१

पालम २०१३० १०७९० ५३.६०

पूर्णा २४४९५ १७२२० ७०.३०

हिंगोली ३१०७४ १५७२५ ५०.६०

कळमनुरी ५०१४६ १३५७२ २७.०६

वसमत ४२०१९ ११४८० २७.३२

औंढा नागनाथ २५७२६ ३१३२० १२१.७४

सेनगाव २७९२४ २३०९२ ८२.६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT