Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Gold Urea : सांगलीत रब्बीसाठी ६० टन गोल्ड युरिया उपलब्ध

Fertilizer Stock : आरसीएफ कंपनीने नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या ६० टन गोल्ड युरिया खताची पहिली खेप रेल्वेद्वारे दाखल झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात आरसीएफ कंपनीने नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या ६० टन गोल्ड युरिया खताची पहिली खेप रेल्वेद्वारे दाखल झाली आहे. या युरियाबाबत शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती सुरू केली जाईल. तसेच त्याचे प्रात्यक्षिकेही घेणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी दिली.

रब्बी हंगामातील पिकांची येत्या काही दिवसांत पेरणी सुरू होईल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खतांची मागणी केली आहे. आरसीएफ कंपनीने नवीन तंत्राचा वापर गोल्ड युरिया हे खत तयार केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने या खताची मागणी केली होती. त्यानुसार ६० टन गोल्ड युरिया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नॅनो युरियाचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नॅनो युरिया फवारणीचे प्रात्यक्षिकही केले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. दहा हजार एकरावर ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी करण्यात कृषी विभागाला यश आले आहे.

जिल्ह्यात नॅनो युरियाबाबत शेतकऱ्यांमध्ये जगजागृती केली. त्या पद्धतीने गोल्ड युरिया वापराबाबत जनजागृतीचे नियोजन सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध भागांत गोल्ड युरिया खत कसे वापरावे याबाबतही प्रात्यक्षिके दिली जाणार आहेत.

रब्बी हंगामासाठी गोल्ड युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध केला आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सांगितले. तालुका कृषी अधिकारी मिलींद निंबाळकर, आरसीएफ कंपनीचे अधिकारी सतीश वाघमारे, सुरेश बाबर, प्रमोद कुदळे, ललीतकुमार डबडे, माधव पुरमवार, संजय नीलावार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT