Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : ‘कोयना’त २४ तासांत सहा टीएमसी पाण्याची वाढ

Koyna Dam Water Level : धरणात २४ तासांत सहा टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून सोमवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंत धरणात ५५.३० उपयुक्त तर ६०.४२ टीएमसी पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पावसामुळे प्रतिसेंकद ६५,५१९ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे.

धरणात २४ तासांत सहा टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून सोमवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंत धरणात ५५.३० उपयुक्त तर ६०.४२ टीएमसी पाणीसाठा आहे.

राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे.

रविवारी धरणाने ५० टक्क्यांवर झाले आहे. रविवारी पावसाचा जोर कायम राहिला असून धुवाधार पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रातील कोयना १७६, नवजा २३६ व महाबळेश्वर २४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणात २४ तासांत पाणीसाठ्यात विक्रमी सहा टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सोमवारी सकाळी आठपर्यंत उपयुक्त ५५.३० व एकूण ६०.४२ टीएमसी (५७.४१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. २४ तासांत पाणीसाठ्यात वाढ होण्याची या वर्षातील पहिलीच वेळ आहे. इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

यामध्ये धोम ३४, धोम-बलकवडी ११०, कण्हेर २३, उरमोडी ६४ व तारळी धरणात ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सहा प्रमुख धरणांत ७२.९२ टीएमसी (५१.७७ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये

कोयना ५५.३०, धोम-४.४०, धोम-बलकवडी- १.६६, कण्हेर- ५.०६, उरमोडी ३.३५, तारळी- ३.१५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर स्थिर; सोयाबीन आजही स्थिर, कापसात चढ उतार, केळीला उठाव तर तूर दबावातच

Onion Nursery: कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग; बियाणे खरेदी अजूनही सुरू

Monsoon Alert: माॅन्सूनचा प्रवास आजही रेंगाळला; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Crop Damage Survey: खानदेशात वादळग्रस्त नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच

Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT