Budget 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार दरवर्षी ६ हजार रुपये; अर्थसंकल्पात करण्यात आली घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

Team Agrowon

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. शेतीक्षेत्रासाठी काय तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्यात पाहूया.

अर्थसंकल्पातील शेती क्षेत्रासाठी प्रमुख तरतुदी-

राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत राज्य सरकार ६ हजार रुपये प्रतिवर्षी देणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या ६ हजार रुपये अनुदाना राज्य सरकार ६ हजार रुपयांची भर घालणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सहा हजार रूपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रूपये असे एकूण १२ हजार रूपये दरवर्षी मिळणार आहेत.

- शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.

- राज्यात गोपीनाथ मुंडे अपघात योजना राबवण्यात येणार

- सेंद्रिय शेतीसाठी एक लाख कोटीची तरतूद करण्यात आली.

- शेळी, मेंढी पालनासाठी राज्य सरकारची १० हजार कोटी बिनव्याजी कर्जाची तरतूद

- ८६ हजार कृषी पंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार

-कोकणातील नदीजोड प्रकल्पातून नदी मराठवाड्यातून आणणार

- धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी १५ हजार मदत देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT