Election Agrowon
ॲग्रो विशेष

Khed Co-op Society Election: खेड खरेदी-विक्री संघ निवडणुकीत रंगत! १८ जागांसाठी ५९ अर्ज दाखल

Election Nominations: खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत चुरस वाढली असून १८ जागांसाठी तब्बल ५९ अर्ज दाखल झाले आहेत. राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या या निवडणुकीत मतमोजणी त्वरित होणार असून निकालही तत्काळ जाहीर केला जाणार आहे.

Team Agrowon

Khed News: विधानसभा निवडणुकीनंतर खेड तालुक्यात पहिल्यांदा सहकारतील सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील, महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मंगळवारी (ता. ११) ५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, बुधवारी (ता. १२) अर्जांची छाननी होणार असून गुरुवार (ता. १३) ते गुरुवार (ता. २७) या कालावधीत किती जण अर्ज माघारी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. उमेदवारांना शुक्रवारी (ता. २८) चिन्हवाटप होणार आहे.

त्यानंतर मतदान ९ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. मतदानानंतर लगेच अर्ध्या तासाने मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. तर मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १५ मतदार संघ असून त्यातून १८ संचालक निवडले जाणार आहेत.

निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ४७४ आहे. खेड तालुक्यात १०२ विकास सोसायट्यांचे आठ मतदार संघ असून त्यामध्ये चाकण गट, वाफगाव गट, आळंदी गट, खेड गट, चास गट, वाडा गट, कडूस गट, महाळुंगे गट या आठ गटांतून एक या प्रमाणे ८ संचालक निवडून जाणार आहे.

तर व्यक्तिगत मतदार संघातून तीन संचालक व महिला प्रतिनिधी (राखीव) या मतदार संघातून दोन संचालक आणि अनुसूचित जाती, जमाती इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग, बिगरशेती सोसायटी प्रोसिसिंग कंजूमर्स संस्था या पाच मतदार संघातून प्रत्येकी एक संचालक या प्रमाणे १८ संचालक निवडले जाणार आहेत.

विशेष म्हणजे प्रोसेसिंग या मतदार संघात फक्त एकच मतदार संख्या आहे आणि कित्येक वर्षे एकच व्यक्ती वा मतदार संघातून संघावर कायम निवडून जाते. खेड तालुका खरेदी-विक्री संघावर अनेक वर्षे सातकर गटाचे वर्चस्व आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT