Zilla Parishad Nashik Agrowon
ॲग्रो विशेष

Zilla Parishad : ‘झेडपी’चे ५८.९९ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Aashima Mittal : जिल्हा परिषदेत असलेल्या प्रशासकीय राजवटीतील दुसऱ्या वर्षाचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ५८.९९ कोटींच्या सादर झालेल्या अंदाजपत्रकास मंगळवारी (ता. २७) विशेष सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मान्यता दिली.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा परिषदेत असलेल्या प्रशासकीय राजवटीतील दुसऱ्या वर्षाचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ५८.९९ कोटींच्या सादर झालेल्या अंदाजपत्रकास मंगळवारी (ता. २७) विशेष सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मान्यता दिली. गतवर्षाच्या तुलनेत यंदाचे अंदाजपत्रकात जवळपास १३ कोटींची वाढ झाली आहे.

मित्तल यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला असून, त्या योजनांसाठी तब्बल सहा कोटींची तरतूद करण्यात आली.यात सुपर १००, प्रत्येक तालुक्यात एक प्रयोगशाळा, स्मार्ट अंगणवाडी, स्पेलिंग बी स्पर्धा आदींचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकांची विशेष सभा प्रशासक मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, महेश बच्छाव यांनी २०२४-२५चे अंदाजपत्रक सादर केले. जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते.

प्रत्यक्षात सुधारित अंदाजपत्रकात सहा कोटींची घट होऊन ते ४० कोटींवर खाली आले. यामुळे यंदा अंदाजपत्रक तयार करताना लेखा व वित्त विभागाने २०२४-२५ या वर्षात ४०.८५ कोटी रुपये जमा होतील, असे गृहित धरले आहे. या रकमेत ठेवींवरील व्याजापासून २७ कोटी रुपये व उपकरांपासून १३ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे गृहित धरून या वर्षाच्या शिल्लक १८ कोटींचा समावेश करून ५८.९९ कोटींचे अंदाजपत्रक डॉ. चव्हाण यांनी मांडले.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सर्व विभागप्रमुख, प्रदीप चौधरी, रमेश जोंधळे, प्रकाश बनकर, प्रदीप सोमवंशी, नितीन पाटील, बाळासाहेब झिरवाळ, संदीप गांवडे, रामेश्वर बागाड आदी उपस्थित होते.

समाजकल्याणची तरतूद वाढवली

जिल्हा परिषदेला सेस निधीच्या २० टक्के रक्कम समाजकल्याण विभागाला, महिला व बालकल्याण विभागासाठी दहा टक्के, दिव्यांग कल्याण पाच टक्के, ग्रामीण पुरवठा विभाग २० टक्के व शाळा दुरुस्तीसाठी पाच टक्के अशी ६० टक्के रकमेची तरतूद करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार अंदाजपत्रकात यासाठी १५.४९ कोटींची तरतूद करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८.२ कोटींची तरतूद केली आहे. समाजकल्याण विभागाला २.६६ कोटींच्या तुलनेत ३.९० कोटी रुपये तरतूद केली आहे. तसेच महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण मिळून ६० लाखांची तरतूद वाढविण्यात आली आहे.

नावीन्यपूर्ण योजनांसाठीची तरतूद

प्रत्येक तालुक्यात एक प्रयोगशाळा १.५० कोटी

स्मार्ट अंगणवाडी १.३५ कोटी

सुपर १०० योजना १.५ कोटी

पीएचसींना साहित्य खरेदी १ कोटी

इंग्लिश स्पेलिंग स्पर्धा २० लाख

पशुवैद्यकीय दवाखाने कायापालट ५० लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT