Zilha Parishad : जळगाव जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक प्रशासन मंजूर करणार

नवीन सदस्य व पदाधिकारी निवडून आलेले नाहीत. यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे.
Zilha Parishad
Zilha ParishadAgrowon

Jalgaon Zilha Parishad : जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. यामुळे यंदाचे किंवा २०२३-२४ चे अंदाजपत्रक प्रशासन मंजूर करणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत पंकज आशिया हे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. तेच प्रशासक म्हणून कामकाज करीत आहे.

कारण पंचवार्षिकची मुदत संपल्यानंतरही निवडणुका पार पडलेल्या नाहीत. आरक्षण मंजूर झाले. यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असेही सांगितले जात होते.

परंतु निवडणुका स्थगित झाल्या आहेत. नवीन सदस्य व पदाधिकारी निवडून आलेले नाहीत. यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे. प्रशासकच यंदा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर करील. मागील वर्षीदेखील प्रशासनानेच अंदाजपत्रक मंजूर केले होते.

सध्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू आहे. यात पूर्वीसारख्याच तरतूदी कायम असणार आहेत. कुठेही मोठी केली जाणार नसल्याची माहिती आहे.

Zilha Parishad
Zilha Parishad : वाशीम जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

यंदाचे अंदाजपत्रक सुमारे २४ कोटी रुपयांचे असणार आहे. यात सर्वांत कमी तरतूद पशुसंवर्धन व कृषी विभागासाठी राहू शकते. तर सर्वाधिक तरतूद शिक्षण विभागासाठी केली जाईल.

शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषदेचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव शहरात शिवतीर्थ मैदानानजीक चालविण्यात येते. हे विद्यालय ब्रिटिशकालीन आहे. या विद्यालयाची इमारतही ब्रिटिशकालीन आहे.

तसेच या विद्यालयानजीक जळगाव पंचायत समितीचे कार्यालयदेखील आहे. या विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व जिल्हाभरातील विद्यालयांचे इतर खर्च यावर मोठी तरतूद केली जाईल.

यातच जिल्हा परिषदेला जळगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यानजीकच्या संकुलातून उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. हे संकुल अनेक वर्षे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. ते भाडेकरूंकरवी रिकामे करून घेताना न्यायालयीन लढाई लढावी लागली.

त्यातून पूर्वीही कमी उत्पन्न येत होते. कारण भाडेकरार जुना होता. या संकुलासंबंधीदेखील काही निर्णय अंदाजपत्रकाच्या वेळेस घेतला जातो, या बाबतही चर्चा सुरू आहे.

Zilha Parishad
District Bank : राष्ट्रीय फोरमसाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा : सतीश मराठे

यातच अंदाजपत्रकात शेतकरी पुरस्कार देताना सन्मानपत्रासह निधीही दिला जावा आणि निवृत्त स्वातंत्र्य सैनिकांचाही सत्कार करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करते.

तसेच पंचायत समितीस्तरावरही या बाबत कार्यक्रम घेतला जातो. हे पुरस्कार देताना संबंधित शेतकऱ्यास सन्मान म्हणून निधीही दिला जावा.

राज्य शासनाच्या कृषिभूषण, शेतीनिष्ठ, सेंद्रिय शेती व महिला शेतकरी पुरस्कार वितरण केले जावे. वीरमरण आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना भरीव मदत स्वनिधीतून केली जावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com