Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरिपाची ५५.३९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, दोन लाख १४ हजार ३४२ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकाची शंभर टक्के म्हणजेच ७४ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्या खालोखाल भात पिकाची २८ हजार ४७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ८६ हजार ९७३ हेक्टर असून, यापैकी दोन लाख १४ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रांवर पेरण्या पूर्ण झाल्या असून, याची टक्केवारी ५५.३९ टक्के आहे. जिल्ह्यात भात पिकासाठी ४३ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रांपैकी २८ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रांत म्हणजे ६५ टक्के क्षेत्रांत भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
खरीप ज्वारीचे ११ हजार १५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ७ हजार १८५.८ म्हणजेच ६४ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. बाजरीसाठी ६० हजार ७३४ हेक्टर क्षेत्रांपैकी १७ हजार २६९.५ हेक्टर क्षेत्रांत, २८ टक्के क्षेत्रांत पेरणी झाली आहे. मका पिकासाठी १५ हजार १९० हेक्टर क्षेत्रांपैकी ८ हजार ७७१.७ हेक्टर क्षेत्रांत म्हणजे ५८ टक्के क्षेत्रांत पेरणी झाली आहे.
इतर तृणधान्यांची जिल्ह्यात ४४७ हेक्टर क्षेत्रांपैकी २२७ हेक्टर क्षेत्रांत म्हणजे ५१ टक्के क्षेत्रांत पेरणी झाली आहे. याप्रमाणे एकूण तृणधान्यांची जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ०९३ हेक्टर क्षेत्रांपैकी ६५ हजार ५८७.९ हेक्टर क्षेत्रांत म्हणजे ४८ टक्के क्षेत्रांत तृणधान्याची पेरणी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.