Lek Ladki Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेच्या ५,४०० अर्जांना मंजुरी

Government Scheme : मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुली शिकाव्यात, यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे.

Team Agrowon

Pune News : मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुली शिकाव्यात, यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातून ७ हजार ३९२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५ हजार ४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्या मंजूर अर्जदार मुलीच्या बॅंक खात्यात जन्मल्यानंतरचा पहिला पाच हजार रुपयांचा हफ्ता वर्ग करण्यात आला आहे.

मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत मुलींना एक लाख एक हजार रुपयांची रकम खात्यात वर्ग केली जाणार आहे. राज्य शासनाने एप्रिलमध्ये ही योजना सुरू केली.

त्या योजनेला लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला होता. त्यानंतर या योजनेचे ५ हजार ४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे.

जन्मतः पाच हजार रुपये रकमेचा पहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर पहिलीत सहा हजार रुपयांचा दुसरा हप्ता, सहावीत सात हजार रुपये, अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण होताच ७५ हजार रुपयांचा शेवटचा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांचे उत्पन्न एक लाख असावे, भविष्यात दोन अपत्त्यांवर प्रतिबंध केलेले असावे, तसेच अधिवास असल्याचा दाखला आणि मुलीसह संयुक्त पासबुक असावे, अशा योजनेच्या अटी असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत ५ हजार ४०० पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. मात्र अजूनही १ हजार ९९२ अर्ज प्रलंबित आहेत. काही अर्जामध्ये त्रुटी असून, त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारांना करण्यात आल्या आहेत. अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT