Agriculture Expo Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Expo : सिल्लोडच्या कृषी महोत्सावांसाठी ५४ लाखांची उधळण

Sillod Agricultural Festival : तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनंगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला कृषी महोत्सव चौकशीच्या फेरी अडकले. या महोत्सवासाठी ‘जिल्हा कृषी महोत्सव’ या योजनेतून ५४ लाख ७१ हजार २८३ रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

Team Agrowon

Krushi Mohotsav : शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या विविध योजना, उपक्रम, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित कृषी महोत्सवांसाठी पहिल्या तिमाहीच्या २० टक्के म्हणजे १ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एकट्या सिल्लोड महोत्सवाला ५४ लाख ७१ हजार २८६ रुपये, तर उर्वरित जिल्ह्यांतील कृषी महोत्सवासाठी ८१ लाख २८ हजार ७१७ रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

कृषी महोत्सव योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील महोत्सवासाठी २० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात केवळ चारच जिल्ह्यांमध्ये कृषी प्रदर्शन भरविता येणार आहे. राज्यात २०२० पासून जिल्हा कृषी महोत्सव राबविण्यात येतो. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन, कृषी प्रदर्शन, परिसंवाद, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने आदी उपक्रम कृषी प्रदर्शनात राबविले जातात.

पाच दिवसांच्या या प्रदर्शनासाठी जिल्हानिहाय २० लाखांचा निधी मंजूर करण्यात येतो. यंदा कृषी प्रदर्शनांच्या आयोजनासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ‘आत्मा’च्या संचालकांनी ७ जुलै रोजी मागणी केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी महोत्सवासाठी ६. ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या तिमाहीच्या १.३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून सिल्लोड महोत्सवासाठी ५४ लाख ७१ हजार २८३ इतका निधी, तर उर्वरित ८१ लाख २८ हजार, ७१७ लाख इतका निधी इतर कृषी महोत्सवांसाठी देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT