Maharashtra Women Welfare Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पात्र महिलांचे थकीत व नियमित मानधन, ई-केवायसीसाठी मुदतवाढ तसेच मानधनात वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत आवश्यक प्रस्ताव मांडण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. तसेच अर्ज नोंदणीचे काम केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्नही वित्त विभागाच्या मान्यतेने तत्काळ मार्गी लावला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले..राज्यातील कष्टकरी महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न व त्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळासोबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महिला कर्मचारी तसेच जनहिताच्या महत्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे..Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर.आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात 'आनंदाचा शिधा' तसेच २०२७ मधील महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महात्मा फुले समता शिधा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. याबरोबरच प्राधान्य कुटुंबांची उत्पन्न मर्यादा वाढवून अधिक कुटुंबांचा समावेश करणे आणि डाळी, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तू रास्त भाव दुकानांतून उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य वित्त विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. .Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत; महिला-बालविकास विभागाच्या सात योजनांना कात्री.शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनासाठी १५२.६१ कोटी रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर वर्ग करण्यात आला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व स्वयंपाकी व मदतनीसांच्या खात्यावर रक्कम जमा होईल; तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. .राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. कष्टकरी महिला, अंगणवाडी व शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या सुरक्षेबरोबरच सामाजिक न्यायासाठी सरकार संवेदनशील पावले उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी शिष्टमंडळातील महिलांना आश्वस्त केले..ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणीलाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये अर्थसाह्य दिले जाते. या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी सरकारने ३४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे दिवाळीच्याआधी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या निकषांनुसार लाखो महिलांना अपात्र करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी महिलांचे मोर्चे निघत आहेत.