Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill : ‘भीमा’ च्या सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन ५० रुपयांचा हप्ता जमा

दिवाळीच्या सणासाठी ५० रुपये प्रतिटना प्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, खासदार धनंजय महाडीक यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

जि. सोलापूर ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने (Bheema Sugar Mill) २०२१-२२ या गाळप हंगामात (Sugar Harvesting Season) गाळपास आलेल्या उसाची पूर्ण एफआरपीची (Sugarcane FRP) रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली असून, दिवाळीच्या सणासाठी ५० रुपये प्रतिटना प्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.

या बाबत माहिती देताना श्री. महाडीक म्हणाले, की कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली असून, ऊसतोडणी टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत.

चालू गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन २ हजार १०० रुपये जाहीर केले आहेत. तसेच कामगारांनाही ८.३३ टक्के बोनस दिला आहे. सभासदांना साखर वाटपास कारखाना कार्यस्थळावर सुरुवात करण्यात आली आहे. ५० रुपयांचा जादा हप्ता आणि एफआरपीप्रमाणे अशी एकूण १०४ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Crisis: करे कोई, भरे कोई...!

Farm Pond: शेततळे कोरडेच

Bt Cotton Launch: कपाशी सरळ वाणांच्या बीटी बियाण्यांचे लोकार्पण

Chaskaman Dam: चासकमान धरणातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

Manikrao Kokate: मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम

SCROLL FOR NEXT