Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango Blossom : सिंधुदुर्गात ५० टक्के हापूस कलमांना मोहर

Favorable Weather Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक हापूस कलमांना मोहर आला असून, उर्वरित कलमांना मोहर येण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक हापूस कलमांना मोहर आला असून, उर्वरित कलमांना मोहर येण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील दहा ते बारा दिवसांत ८० टक्के कलमांना मोहर येण्याची शक्यता आहे.

लांबलेल्या पावसामुळे या वर्षी हापूस हंगाम लांबणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पावसामुळे हापूसच्या कलमांना ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मोहर येण्याऐवजी पालवी आली. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत हंगाम महिनाभर लांबणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडणारी थंडी अखेरच्या आठवड्यात सुरुवात झाली.

त्यामुळे गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत हापूसला चांगला मोहर फुटू लागला आहे. विशेषतः किनारपट्टीच्या देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये कलमे मोहराने बहरल्याचे चित्र दिसत आहे. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांच्या पश्चिमेकडील भागात देखील मोहर येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या थंडीचे प्रमाण जिल्ह्यात चांगले असल्यामुळे उर्वरित झाडांना देखील येत्या दहा ते पंधरा दिवसांत चांगला मोहर येण्याचा अंदाज आहे.

एकीकडे पश्चिमेकडील हापूसच्या झाडांना जरी मोहर येत असला तरी पूर्वपट्ट्यात एखादा दुसरा अपवाद वगळता अजूनही मोहर फुटण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे या भागातील हंगाम अधिकच लांबणार आहे. मे अखेरीस किंवा त्यानंतर देखील येथील आंबा चाखायला मिळण्याची शक्यता आहे.

४० ते ५० टक्के झाडांना चांगला मोहर आला आहे. आता देखील मोहोर येण्यासाठी पोषक स्थिती आहे. सद्यःस्थितीत तुडतुडे, फूलकिडींचा प्रादुर्भाव बागांवर दिसून येत नाही. सध्या थंडी वाढत असल्यामुळे उर्वरित झाडांना देखील मोहोर येईल.
डॉ. अजय मुंज, शास्त्रज्ञ, फळसंशोधन उपक्रेंद्र रामेश्वर, देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT