Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ५० कोटी रिझर्व्ह बँकेकडे

Inactive Bank Accounts : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील १ लाख ९१ हजारांवर खातेदारांची ५० कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील १ लाख ९१ हजारांवर खातेदारांची ५० कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आली आहे. संबंधित खातेदारांनी आवश्यक ती कागदपत्रे दिल्या जिल्हा बॅंक खातेदारांना परत करणार असल्याचे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग दहा वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन-वर्किंग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील एक लाख ९१ हजार १३२ खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयेइतकी रक्कम विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती.

ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ हजार ७५९ खातेदारांचे २० कोटी ४५ लाख आठ हजार, तर दुसऱ्‍या टप्प्यात एक लाख १५ हजार ३७३ खातेदारांची २९ कोटी चार लाख १९ हजार रुपये इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली.

बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदाराची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले.

..तर बँक रक्कम परत करणार

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे असले तरी ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत, त्या खातेदार आणि त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला दिल्यास त्याची रक्कम संबंधित खातेदारांना दिली जाईल, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT