Sugarcane Worker agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker : ऊसतोड कामगारांच्या वारसांना ५ लाखांची मदत वितरण

Sugarcane Worker Beed : बीड जिल्ह्यातील ३१, जालना ३, धाराशिव-७, अहमदनगर २३ आणि पुणे ३ असे एकूण ६७ प्रस्तावाकरीता ३ कोटी ३५ लाख रुपये संबंधित जिल्ह्यांना वर्ग केले.

sandeep Shirguppe

Maharashtra Agriculture News : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीचे कुटुंबिय, वारसदारांना महामंडळाच्यावतीने ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. शासनाने बीड जिल्ह्यातील ३१, जालना ३, धाराशिव-७, अहमदनगर २३ आणि पुणे ३ असे एकूण ६७ प्रस्तावाकरीता ३ कोटी ३५ लाख रुपये संबंधित जिल्ह्यांना वर्ग केले.

पुणे जिल्ह्यातील स्व. यादव क्षीरसागर आणि स्व. उमेश चव्हाण या ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसदार शिवकन्या क्षीरसागर आणि सुशीला चव्हाण यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले. उर्वरित एका वारसदाराला लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी आमदार चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके, व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, बबन माने आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Cattle Transport: अवैध जनावर वाहतुकीवर कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलिसांनाच!

Coconut Farming : कोकणातील नारळाची शेती मराठवाड्यात

Wild Vegetables Fair : सातपुड्याच्या पायथ्याशी रंगतोय सालईबन रानभाजी महोत्सव

Drip Irrigation: तुषार सिंचन संचाची योग्य निवड

Crop Disease Management: मूग, उडदावरील केवडा रोग व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT