Lakhpati Didi Yojna 
ॲग्रो विशेष

Lakhpati Didi Yojna : देशातील महिलांना लखपती दीदी योजनेतून बिना व्याजी ५ लाखांचे कर्ज

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेबाबत घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक मदत करणे असून २ कोटी महिलांवरून ३ कोटी महिलांना प्रशिक्षण देणे आहे असाही दावा मोदी सरकारकडून करण्यात आला आहे. तसेच या योजनेतून महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत असल्याचाही दावा मोदी सरकारने केला आहे.

लखपती दीदी योजनेतंर्गत देशभरातील खेड्यातील २ कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्ती करण्यासह प्लंबिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती वेळोवेळी केंद्र सरकारने दिली आहे. तर ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जात असल्याचाही दावा सरकारने केला आहे.

योजनेतंर्गत किती कर्ज?

केंद्रातील मोदी सरकारने देशात १५ ऑगस्ट २०२३ रोजी लखपती दीदी योजना सुरू केली. या योजनेतून महिलांना बिनव्याजी ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. तसेच या योजनेतून १ लाखापासून १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा असून आतापर्यंत योजनेतून १ कोटी महिलांना लाभ मिळाल्याचा दावा देखील सरकारने केला आहे.

योजनेंतर्गत कर्जाची प्रक्रिया

या योजनेंतर्गत कर्जाची मागणी करण्याआधी महिलेची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असणे गरजेची आहे. नोंद असेल तर विभागीय बचत गट कार्यालयात अर्जाद्वारे कर्जाची करता येते. व्यवसाय योजनेसह आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर छाननी आणि अर्जांची पाहणीनंतर संबंधीत महिला कर्जासाठी पात्र ठरते.

लखपती दीदी योजनेतंर्गत कोण पात्र?

१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असून त्या अर्ज करू शकतात.

तर या योजनेसाठी महिला बचत गटाचा हिस्सा असणे महत्त्वाचे आहे.

याशिवाय महिलांनी व्यवसायाच्या योजनेसह आवश्यक कागदपत्रेही सादर करावीत

आवश्यक कागदपत्रे

पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, एक फोटो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT