Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : जालना जिल्ह्यात ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Water Stock : जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये महिनाभरापूर्वी पावसाअभावी केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

Team Agrowon

Jalna News : पावसाअभावी कोरडे पडलेल्या मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. परिणामी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो आजघडीला ४९.३८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये महिनाभरापूर्वी पावसाअभावी केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्येही जिल्ह्यात टॅंकर सुरू होते. मात्र, मागील पंधरा दिवसांमध्ये जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडत असून आजघडीला ४९.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

यामध्ये सात लघुप्रकल्पांमध्ये ४३.९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील धामना आणि अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. तर, भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारा कोरडा पडलेल्या जुई मध्यम प्रकल्पात ३४.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

याशिवाय जालना तालुक्यातील कल्याण गिरिजा प्रकल्पात ३६.९२, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्पात ३४.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर, ५७ लघू प्रकल्पांमध्ये ५१.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये २५ टक्क्यांपर्यंत ११, २६ ते ५० टक्क्यांपर्यंत १०, ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत ७ आणि ७६ ते १०० टक्क्यांदरम्यान २२ लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

दोन मध्यम प्रकल्प जोत्याखालीच

जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी ही जोत्याखाली आहे. यामध्ये जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प आणि बदनापूर तालुक्यातील अपर दुधना प्रकल्पाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT