Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Vacancy : गेवराई तालुक्यात कृषी विभागाची ४६ पदे रिक्त

Agriculture Department Update : गेवराई तालुका कृषी कार्यालयातील ८७ मंजूर पदांपैकी ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Team Agrowon

Beed News : शेती आणि शेतकरी यांना शासनाबरोबर जोडण्यात आलेला दुवा म्हणून कृषी कार्यालयाची ओळख आहे. परंतु, गेवराई तालुका कृषी कार्यालयातील ८७ मंजूर पदांपैकी ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीत फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मोफत बियाणे वाटप, मातीपरिक्षण, अतिवृष्टी, अवकाळीचे पंचनामे,

पंतप्रधान किसान सन्मान व नमो महासन्मान योजनेचे काम याशिवाय शेतकऱ्यास शेती पूरक मार्गदर्शन आदी कामे रिक्त पदांमुळे वेळेत होत नाहीत. वेळीच गेवराई तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

कृषी सहायकांची दमछाक

गेवराई, उमापूर, मादळमोही आणि जातेगाव या चार मंडळात प्रत्येकी १२ तर तालुका कृषी कार्यालय येथे एक असे एकूण ४९ कृषी सहायकांची पदे मंजूर असताना, तब्बल ३३ कृषी सहायक यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कृषी सहायक यांच्याकडे दहा-दहा गावांचा भार सोपविण्यात आल्याने कृषी सहायक यांची चांगलीच दमछाक होत आहे.

या पिकांना प्राधान्य

गेवराई तालुक्यात पेरणी योग्य जवळपास १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा तर उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी, मका आदी पिके शेतकरी घेतात.

गेवराई तालुका कृषी कार्यालयातील रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून, प्रशासनाकडून भरती होताच येथील रिक्त पदाबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
अभय वडकुते, तालुका कृषी अधिकारी, गेवराई
आधीच कृषी मंडळ कार्यालयाचा तालुका कृषी कार्यालयातून कारभार आहे, त्यातच रिक्त पदांचे दुखणे यामुळे एका चकरीत कामे तर सोडाच पण शेतीपूरक मार्गदर्शन मिळणे कठीण होऊन बसले आहे.
राधेश्याम लेंडाळ, शेतकरी, जातेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT