Kolhapur Agriculture Department : शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा, आधुनिक तंत्रज्ञानाची मिळणार माहिती

Agriculture Department : या दौऱ्यामध्ये फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणुन घेता येणार आहे.
Kolhapur Agriculture Department
Kolhapur Agriculture Departmentagrowon
Published on
Updated on

Study Tour Farmers : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतंर्गत शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा राबविण्यात येत आहे. फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इ. बाबत प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक १० जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, ८ अ, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.

या दौऱ्यामध्ये फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणुन घेता येणार आहे. या कार्यक्रमांतंर्गत राज्यात फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे.

Kolhapur Agriculture Department
Kolhapur Jilha Bank : २० गुंठे जमिनीवर मिळणार ५ लाख रुपये कर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेची मोठी संधी

फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या मध्यामातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे यासाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरूण भिंगारदेवे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com