Buldana News : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा रविवारी (ता. १२) होत आहे. या निमित्ताने राजवाडा तसेच जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सूर्योदयी प्रशासन, मराठा सेवा संघ व नागरिकांच्या वतीने महापूजा होणार आहे.
यंदाच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ सृष्टीवर कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. जिजाऊ सृष्टीवरील जन्मोत्सव सोहळ्यासाठी जिजाऊभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
या महोत्सवानिमित्त राजवाड्यावर आकर्षक रोषणाई केली आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. मशाल यात्राही निघाली. दरम्यान, रविवारी सूर्योदयी ११ जोडप्यांच्या हस्ते राजवाड्यात माँसाहेब जिजाऊ यांची महापूजा होईल. त्यानंतर वारकरी दिंडी, सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म ध्वजवंदन, शाहिरांचे पोवाडे, नवोदित वक्ते, कलाकार आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात होणार आहे.
सोबतच ११ जोडप्यांचा शिवविवाह सोहळाही होणार आहे. तर मुख्य सोहळा दुपारी शिवधर्म पिठावर प्रारंभ होईल. या वेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळाही होत आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी दालन
शेतकऱ्यांसाठी विठ्ठलराव विखे पाटील कृषी दालन उभारण्यात आले असून यामध्ये मार्गदर्शन केंद्र, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती अवजारे, विविध बीज उत्पादक, रासायनिक खते, औषधी कंपन्या सहभागी झालेल्या आहेत.
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. त्याअनुषंगाने या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे-नागपूर व सिंदखेडराजा-देऊळगाव राजा मार्गावरील जड वाहतूक रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
जालना-सिंदखेडराजा-मेहकरऐवजी पर्यायी मार्ग जालना-देऊळगाव राजा-चिखली-मेहकरचा वापर करावा. तर मेहकर-सिंदखेडराजा-जालना ऐवजी पर्यायी मार्ग मेहकर-चिखली देऊळगाव राजा-जालना या मार्गाचा वापर करावा. तसेच देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा- सिंदखेड राजा ते देऊळगाव राजा या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.