Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मागील हंगामापेक्षा ४१ लाख टन ऊसगाळप कमी

मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी एक कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत ४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप कमी झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयाअंतर्गत नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू (Sugarcane Crushing) केले होते. सध्या या कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. या कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे.

मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी एक कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत ४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप कमी झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात २० खासगी तर ११ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता.

यंदा हंगामाची सुरुवात २२ आक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली. गाळप हंगामात विभागात ३० कारखाने सुरू झाले होते.

यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील सहा सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश होता.

सध्या विभागातील सर्वच तीस कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे. या ३० साखर कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के असल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.

दरम्यान, मागीलवर्षी नांदेड विभागाचा गाळप हंगाम जूनपर्यंत लांबला होता. यात २७ कारखान्यांनी एक कोटी ४७ लाख आठ हजार ३४७ टन उसाचे गाळप, एक कोटी ५३ लाख २१ हजार ६५३ क्विंटल साखरचे उत्पादन केले होते. तुलनेत ४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप कमी झाले आहे.

मागीलवर्षी विक्रमी गाळप

नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील गाळप हंगाम २०२१-२२ साठी २७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यात १८ खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता.

उसाचे क्षेत्र अधिक असल्याने गाळप हंगाम जूनपर्यंत लांबला होता. या काळात एकूण २७ कारखांनी एक कोटी ४७ लाख आठ हजार ३४७ टन उसाचे गाळप, एक कोटी ५३ लाख २१ हजार ६५३ क्विंटल साखरचे उत्पादन केले होते.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा - कारखाने- ऊस गाळप- साखर उत्पादन

नांदेड- ६ - १७,७४,४४१ - १७,७७,६२०

लातूर - १२- ४३,३९,८०५ - ४३,८२,०५६

परभणी - ७ - २८,९४,९८३ - २८,७७,९४०

हिंगोली - ५ - १५,५६,५५०- १६,४२,०२५

एकूण - ३० - ०१,०५,६५,७७८ - ०१,०६,७९,६४१

विभागाचा सरासरी साखर उतारा : १०.११ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT