Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी जमा

Karj Mafi Yojana: कर्जमुक्ती योजनेचा लाभ न झालेल्या आणि कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना शासनाने राबविली.

Team Agrowon

Sindhudurg News : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Debt Relief Scheme) आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत. अद्याप २ हजार ७८३ शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ न झालेल्या आणि कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना शासनाने राबविली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २२ हजार ८०४ शेतकऱ्यांनी प्रोत्साहन अनुदानासाठी ऑनलाईन प्रस्ताव केले होते.

त्यातील १५ हजार ७६१ शेतकऱ्यांची यादी अनुदानासाठी जाहीर झाली. आधार प्रमाणीकरण आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या टप्प्यात असे एकूण १२ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ४० कोटी २९ लाख रूपये जमा करण्यात आली आहे.

यादीत असलेले २ हजार ७८३ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये किवा कर्जाच्या तुलनेत अनुदान दिले जात आहे.

१५ हजार ७६१ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीदेखील आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
डॉ. माणिक सांगळे, उपनिबंधक, जिल्हा सहकारी संस्था, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT