PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Yojana : एकाच शेतकऱ्याला २ वेळा पीएम किसानचा हप्ता, राज्यातील ४१६८ शेतकऱ्यांवर होणार कारवाई

Maharashtra PM Kisan : राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ आधार क्रमांकाद्वारे दोन वेळा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे.

sandeep Shirguppe

PM Kisan Scheme : पीएम किसान निधी योजनेत एकच व्यक्ती दोन वेळा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ आधार क्रमांकाद्वारे दोन वेळा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचे एकच खाते चालू ठेवून दुसरे खाते बंद करण्याचे आदेश सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी असा गैरप्रकार केला आहे त्या शेतकऱ्यांकडून रकमेची वसुलीही करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता ५ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. ज्यांनी २ वेळा लाभ घेतला आहे त्यांनी दुरुस्ती न केल्यास १८ हप्ता मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तर यापुढे मिळणार नाही लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्यातील ८ हजार ३३६ खात्यांची पडताळणी केली यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दोन आधार असल्याचे स्पष्ट झाले. एकच आधार क्रमांक असल्यास त्याला संलग्न बैंक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाते. मात्र, या खात्यांची आधार दुरुस्ती प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. या खात्यांना दुबार आधार असल्याने दुरुस्ती झाल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ यापुढे देता येणार नाही अशी माहिती कृषी विभागाकूडन देण्यात आली.

बंद करण्यात येणाऱ्या आधार क्रमांकाचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून या खात्यावर योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या सर्व रकमेची वसुली करण्याची जबाबदारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT