Mango Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival : सांगलीतील आंबा महोत्सवात ४ लाखांची उलाढाल

Mango Update : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवात सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Sangli News : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवात सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार (ता. २४) या एका दिवसात ९०० डझन आंब्याची विक्री झाली. असून सुमारे चार लाख रुपयांची उलाढाल झाली, असल्याची माहिती पणन मंडळ कोल्हापूरचे डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.

सांगली येथील कच्छी भवन येथे शुक्रवार (ता. २४) कृषी विभाग व कृषी पणन मंडाळामार्फत आयोजित केला आहे. या आंबा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी आंबा महोत्सवाला भेट दिली. जिल्ह्यात पणन मंडळाकडून आंबा महोत्सव हा उपक्रम आयोजित करत आहेत, ही बाब चांगली आहे. त्यामुळे सांगलीतील ग्राहकांना खात्रीशीर आणि दर्जेदार केशर आणि हापूस आंबा उपलब्ध होत. उत्पादक ते थेट ग्राहक विक्री ही संकल्पना चांगली आहे. त्यामुळे विक्री व्यवस्थेची साखळी भक्कम होण्यास मदत होत आहे, असे मत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी व्यक्त केले.

आंबा महोत्सवात पहिल्या दिवशी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांतील १९ शेतकरी सहभागी झाले होते. महोत्सवात शुक्रवारी (ता. २४) केसर आणि हापूस या दोन जातींच्या १००० डझन आंब्याची आवक झाली होती. एका दिवसात ९०० डझन आंब्याची विक्री झाली असून, चार लाखांची उलाढाल झाली आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २५ शेतकऱ्यांकडून केसर, हापूस या दोन जातींचे दीड ते दोन हजार डझन आंबा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. सकाळपासून ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली आहे. दुसऱ्या दिवशीही आंबा महोत्सवाला सांगलीकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता. २६) महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या महोत्सवाला सांगलीकरांना लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पणन व कृषी विभागाने केले आहे. शनिवारीही सुमारे पाच लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रदर्शनात विविध जाती

आंबा महोत्सवात वनराज, दूधपेठा, माया, छोटा जहांगीर, गोवा मानकुरा, चेरुका, काळा गंडरस, पदेरी, यासह ४७ जातीचे आंबे प्रदर्शनात ग्राहकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. या वेळी ग्राहकांकडून या जातीच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच कृषी विभागाच्या शासकीय रोपवाटिकेतील केसर जातींच्या कलमी रोपे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. सुमारे २५ रोपांचीही विक्री झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT